Pune Weather Update sakal
पुणे

Pune Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम

पुण्यात उन्हाचा चटका गुरुवारीही कायम होता. शहरात शिवाजीनगर येथे कमाल ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, मगरपट्टा येथे पाऱ्याने ४२ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली होती. पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात उन्हाचा चटका गुरुवारीही कायम होता. शहरात शिवाजीनगर येथे कमाल ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, मगरपट्टा येथे पाऱ्याने ४२ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली होती. पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल. त्यानंतर रविवारपासून (ता. ५) ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील, अशी शक्यता हवामान खात्याने गुरुवारी वर्तविली.

शहरात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जात आहे. कोरेगाव पार्क येथे ४०.८, चिंचवड येथे ४०.१, हडपसरमध्ये ३९.६ आणि एनडीए येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात तापमानात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

चंद्रपुरात ४३ अंश तापमान

सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे उन्हाचा चटका कायम असल्याने सोलापूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वर्धा येथे तापमान चाळिशीच्या वर गेले आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र होरपळले

वादळी पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात होरपळ वाढली आहे. शुक्रवारी (ता. ३) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT