पुणे

शिवाजीनगरमध्ये नाल्यात विनापरवाना काम

CD

शिवाजीनगर, ता. १९ : नाल्यात विनापरवाना खोदाई करून काम केल्याप्रकरणी योग्य ती कार्यावही करावी, असे पत्र शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक सहा यांना दिले आहे. बीएससीसी रस्त्याजवळील एच. व्ही. सरदेसाई, भरत पाठक यांच्या बंगल्याशेजारील नैसर्गिक नाल्यात विनापरवाना खोदाई करून सिमेंटचे पाईप बसवण्यात आले आहेत. नैसर्गिक नाला, ओढ्यात काम करायचे असेल तर महापालिकेची परवानगी आवश्यक असते; परंतू कोणतीही परवानगी न घेता काम केल्याने संबंधित काम होईपर्यंत अधिकारी शांत का होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमच्या मलःनिस्सारण विभागाकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. तेथे विनापरवाना काम चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाहीसाठी बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळविले आहे, असे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT