dalvi hospital 
पुणे

डॉ. दळवी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे हाल; कर्मचारीवर्ग वाढवण्याची मागणी

समाधान काटे

शिवाजीनगर- शिवाजीनगर येथील पुणे महापालिकेच्या डॉ. दळवी रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. शिवाजीनगरमध्ये झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणात आहे. सर्व सामान्य नागरिकांना उपचारासाठी एकमेव पुणे महापालिकेचे सर्वात मोठे तीन मजली डॉ.दळवी रुग्णालय असून या ठिकाणी ९० खाटांची संख्या आहे. ९० पैकी १० खाट अतिदक्षता विभागात असून जवळपास ८५ ते ८७ खाटांवरती कोरोना रुग्ण आहेत. पुणे शहराच्या विविध भागातून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात.२४ तास चालू असलेल्या या रुग्णालयात  तीन शिफ्ट मध्ये २१ डॉक्टर, ३० नर्स (परिचारिका) काम पाहतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी केली.वेळेवर जेवण, औषध मिळत नाहीत. बेडशीट वेळेवर बदलले जात नाही. अस्वच्छता असते. रुग्णांना अशा अनेक समस्यांना डॉ.दळवी रुग्णालय  सामोरे जावे लागत आहे.

"नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ऑक्सिजन बेडकडे लक्ष देणे, इंजेक्शन देणे, तपासणी करणे यासाठी अजून डॉक्टर,नर्स ,कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेकडे केली आहे, असं वैद्यकीय अधिकारी डॉ.मधुरी पवार म्हणाल्या.

"आमचे नातेवाईक डॉ.दळवी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सलाईन संपले तर लक्ष देण्यासाठी नर्सला चार वेळा बोलवावे लागते. स्वच्छता नाही, रुग्णालयात जेवण वेळेवर येते पण रुग्णांना वेळेवर मिळत नाही. तसेच गोळ्या सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. त्याचे कारण विचारले असता कर्मचारी कमी असल्याचे सांगण्यात येते", असं रुग्णाचे नातेवाईक निलेश निकम म्हणाले.

शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
 
डॉ.दळवी रुग्णालयासाठी एकूण ४० ते ४५ डॉक्टर, नर्सची आवश्यकता असून.सध्या कर्मचारी अपुरे पडतात.आहेत त्या कर्मचाऱ्यांपैकी पाच नर्स, दोन मावश्यांना कोरोना झाल्याने त्या उपचार घेत आहेत. मंगळवारी अचानक तीन रुणांचा मृत्यू झाल्याने मृतदेह बांधून त्यांना उचलण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने जवळपास ८० किलो वजनाचे मृतदेह नर्स महिला कर्मचाऱ्यांनी उचलून ठेवले. कचारा गाडी वेळेवर न येता नियमित त्यांना फोन करावा लागतो. असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच इथेच कोरोनाची लस देण्याचे काम सुरू असल्याने काही कर्मचारी लस देण्यासाठी देखील मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT