metro 
पुणे

पुणे : शिवाजीनगरपासून मेट्रो फुरसुंगीपर्यंत धावणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) मेट्रो हिंजवडी- शिवाजीनगरपासून फुरसुंगीपर्यंत धावणार आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प दिल्ली मेट्रोने केला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत शिवाजीनगर ते फुरसुंगी अशा सुमारे 12 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळेल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. 

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी 2019 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. हडपसर भागातही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराचा मध्यवर्ती भाग, तसेच हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी- शिवाजीनगर- हडपसर- फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसरपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हिंजवडी ते फुरसुंगीपर्यंत मेट्रोच्या मार्गावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते म्हणाले, ""हिंजवडी ते शिवाजीनगर असा 23 किलोमीटरचा मेट्रोमार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगरपासून हा मार्ग हडपसरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. त्याचा अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रोला दिले आहे. पुढील महिन्यात तो अहवाल पीएमआरडीएला प्राप्त होणार आहे. हा मार्ग सुमारे 12 किलोमीटर लांबीचा असून, त्यामध्ये 11 स्टेशन असणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत या मेट्रोमार्गाला मंजुरी मिळेल. या मार्गावरून सहा डबे असलेल्या एकूण 57 मेट्रोच्या कार धावणार आहेत.'' 

असा असणार मेट्रोचा मार्ग 
शिवाजीनगर (कोर्ट)- रेल्वे कॉलनी- एमजी रोड- फॅशन स्ट्रीट - रेसकोर्स - काळूबाई चौक - वैदूवाडी- हडपसर फाटा- हडपसर बस डेपो- ग्लायडिंग सेंटर- फुरसुंगी आयटी पार्क- सुलभ गार्डन असा हा मार्ग असणार आहे. भविष्यात हा मार्ग रिंगरोडला जोडण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT