पुणे

शिवणे-खराडी रस्त्यासाठी भूसंपादनाला गती

CD

पुणे, ता. २२ ः ‘‘शिवणे-खराडी रस्त्याच्या प्रलंबित कामासाठी आवश्‍यक जागा तातडीने ताब्यात घेण्यात यावी. त्यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्या,’’ असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शनिवारी (ता. २२) महापालिका प्रशासनास दिले.
खराडी-शिवणे रस्ता प्रकल्पातील कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रम, सनसिटी ते कर्वेनगर नवीन पूल या परिसरातील कामांची पाहणी महापौर मंजूषा नागपुरे, आयुक्त नवलकिशोर राम यांनी शनिवारी केली. प्रलंबित रस्ते, उड्डाणपूल, भूसंपादन आणि विकासकामाची माहिती घेत संबंधित कामाला गती देण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले. या वेळी पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, उपायुक्त निखिल मोरे, विजयकुमार थोरात, प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र जाधव, मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय गायकवाड, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमापासून संबंधित पाहणीस सुरुवात झाली. मातोश्री वृद्धाश्रम ते वनदेवी मंदिराकडे जाणाऱ्या १२ मीटर विकास आराखड्यातील (डिपी) रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव आठवडाभरात सादर करावा, या रस्त्यासाठीची शासकीय जागा तातडीने ताब्यात घेण्यात यावी, अशा सूचना पथ, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी दिल्या. त्रिमूर्ती जिम परिसरातील पूर्वी पुनर्वसन झालेल्या बाधित रहिवाशांबाबतही कार्यवाही करावी. राजाराम पुलाजवळील मातोश्री वृद्धाश्रम चौकात उड्डाणपुलाबाबत नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी या वेळी दिल्या.

‘कार्यवाही तातडीने करा’
शिवणे-खराडी ३६ मीटर डीपी रस्त्याच्या उर्वरित भूसंपादन आणि टीडीआर प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, जावळकर उद्यान ते आंबेडकर चौक आणि तिरुपतीनगर ते गोपीनाथनगर येथील रस्त्यांची कामे व पाणंद रस्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT