पुणे

...म्हणून येताहेत शिवभोजन मिळविण्यात अडचणी

सकाळवृत्तसेवा

खेड-शिवापूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेली शिवभोजन थाळी केंद्रे गरीब आणि गरजू लोकांचा आधार बनली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या शिवभोजन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालक त्रस्त झाले असून, गरीब आणि गरजू लोकांना न जेवताच परतावे लागत आहे. या ऍपमध्ये बिघाड आल्यास त्यावर दुसरा पर्याय काढण्यात यावा, अशी मागणी शिवभोजन केंद्रचालक करत आहेत. 

गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात जेवण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत तर ही शिवभोजन केंद्रे अनेक गरजू कामगारांचा आधार बनली आहेत. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून या शिवभोजन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे हे शिवभोजन थाळी केंद्रचालक त्रस्त झाले आहेत. 

शिवभोजन नावाचे ऍप शिवभोजन केंद्रचालकांना देण्यात आले आहे. या केंद्रावर जेवायला आलेल्या व्यक्तीचा या शिवभोजन ऍपमध्ये फोटो काढून तो सबमिट करावा लागतो. त्यानंतर त्या ऍपमधून त्या व्यक्तीच्या जेवणाचे कूपन येते. त्यानंतर त्या व्यक्तीला जेवण दिले जाते, अशी पद्धत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शिवभोजन केंद्र चालक त्रस्त झाले आहेत. 

वेळू (ता.भोर) येथील शिवभोजन थाळी केंद्रचालक बाळासाहेब वाडकर म्हणाले, "स्वस्त दरात जेवण मिळत असल्याने शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सध्या शिवभोजन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक जणांना न जेवताच परत जावे लागत आहे. या ऍपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरू करणे आवश्यक आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

सासूशी अजिबात पटवून घेत नाही 'या' मूलांकाच्या सुना; घरात वाद आणि मतभेद !

Latest Marathi News Live Update : रोहितची अस्वस्थता साहाजिकच, सर्वांनाच अपघाताचं उत्तर हवय – सुप्रिया सुळे

Vadhavan Port: वाढवण बंदर प्रकल्पाला गती! महामार्ग भूसंपादनाच्या मोबदल्याची कार्यवाही सुरू

Thane News: पाच हजार झोपडपट्टीधारकांवर कारवाईची टांगती तलवार, न्यायालयाचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT