पुणे

गरीबांना शिवभोजनाचा आसरा; जाणून घ्या पुण्यात कुठे कुठे मिळतेय ही थाळी?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाराष्ट्रात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शिवभोजन थाळी सुरू झाली. त्यानंतर पहिल्यांदाच शिवभोजन थाळी फ्री म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता मिळणार आहे. सध्या राज्यात लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यासाठी गरीब आणि गरजू लोकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या निर्बंधांविषयी माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की गरिबांना ही थाळी पार्सलच्या माध्यमाधून उपलब्ध होईल. या थाळीमध्ये दोन चपाती, भाजी, एक वाटी डाळ आणि भात यांचा समावेश असेल. तसेच, राज्यात रोज ९६४ केंद्रावरून 2 लाख शिवभोजन थाळींचे वितरण राज्यात करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली. दरम्यान, ही घोषणा जाहीर झाल्यापासून लोक ९६४ शिव भोजन थाळी देणाऱ्या केंद्राची यादीची मागणी करत आहे. दरम्यान, नागरिकांच्या मागणीनुसार, शिवसेनेकडून पुण्यातील शिवभोजन थाळी देणाऱ्या केंद्राची यादी जाहीर केली आहे.

जाणून घ्या पुण्यातील शिवभोजन थाळी देणारी केंद्रं कोणकोणती आहे?

  • · श्री स्वामी समर्थ टी अॅन्ड स्नॅक्स सेंटर - Shree Swami Samarth Tea and Snacks

  • · एस कुमार वडेवाले - S Kumar Wadewale

  • · शिव समर्थ भोजनालय - Shiv Samarth Bhojnalay

  • · हॉटेल कप्तान व्हेज नॉनव्हेज - Hotel Kaptan Veg-Nonveg

  • · साई-सेवा एंन्टरप्राईझेस- Sai Sewa Enterprises

  • · श्री स्वामी समर्थ स्नॅक्स आणि टी हाऊस- Shree Swami Samarth Snacks and Tea House

  • · क्वालिटी केटर्सस - Kwality Caterers

  • · माऊली एंटरप्राईझेस- Mauli Enterprises

  • · एकता फार्मर प्रोड्यूस कंपनी लिं. Ekatva Farmer Producer Company Ltd

  • · सुनेत्रा महिला बचत गट- Sunetra Mahila Bachat Gat

  • · ग्रीन पॅलेस रेस्टॉरंट- Green Palace Restaurant

  • · कात्रज कॉर्नर - Katraj Cornrer

  • · हॉटेल ह्रद्यसमर्थ - Hotel Hrudaysamrat

  • · हॉटेल कोल्हापूरी तडका - Hotel Kolhapuri Tadka

  • · हॉटेल साईनाथ व्हेज- Hotel Sainath Veg

  • · के. जी. गुप्ता एँन्ड सन्स- KG Gupta and Sons Bar 1,2

  • · श्री गणेश सॅन्क्स एँन्ड भोजनालय- Shree Ganesh Snacks and Bhojnalaya

  • · श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक्स- Shree Swami Samarth Krupa Snacks

  • · श्री तुकाराम महाराज संस्थान- Shree Tukaram Maharaj Sansthan

  • · प्रतिक हॉटेल- Pratik Hotel

  • · हॉटेल समाधान- Hotel Samadhan

  • · हॉटेल यशोदा - Hotel Yashoda

  • · हॉटेल निशिगंध व्हेज - Hotel Nishigandha Veg

  • · प्रतिभा महिला प्रतिष्ठान - Pratibha Mahila Pratishtan

  • · स्वयंम महिला बहुद्देशीय संस्था- Swayam Mahila Bahhudeshiya Sanstha

  • · श्री प्रसाद फूड एँन्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस- Shree Prasad Food and Hospitality Services

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळात शिवभोजन थाळीमुळे लाखो स्थलांतरीत नागरिकांना आधार मिळाला होता. लॉकडॉऊनच्या काळात शिवभोजन थाळी सुरवातीला प्रत्येक थाळीनुसार १० रुपये शुल्क आकारून उपलब्ध करण्यात आली होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यानी ही किमत प्रत्येक थाळीनुसार ५ रुपये इतकी कमी केली. दरम्यान, सध्या ही थाळी एका महिन्यासाठी मोफत उपलब्ध केली जाणार आहे. तसेच महाआघाडी सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी गरिबांसाठी ३ किलो गहू, २ किले तांदूळ वितरण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT