शिवजयंती  Sakal
पुणे

Shivjayanti: तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा शिवनेरीवर दिमाखात साजरा

मुंबईतील इस्त्राईलच्या वाणिज्यदूत कोब्बी शोशानी ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे आज सोमवार ता.२१ रोजी किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे, मनसेचे उपनेते अमित ठाकरे,पावनखिंडचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, कल्याणचे मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपच्या महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड वर्षां डहाळे, आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मुंबईतील इस्त्राईलच्या वाणिज्यदूत कोब्बी शोशानी ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिवाई देवीला अभिषेक व महापूजा झाली. शिवाईमंदिर ते शिवजन्मस्थाना पर्यत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी छबिना मिरवणूक काढण्यात आली. शिवजन्मस्थानी पारंपारिक पध्दतीने पाळणा म्हणून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवकुंज येथे राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शाहीर हेमंत मावळे, होनराज मावळे यांनी शिवरायांच्या शौर्यगाथेचे पोवाडे सादर केले. यावेळी झालेल्या अभिवादन सभेत बोलताना इस्त्राईलच्या वाणिज्यदूत कोब्बी शोशानी यांनी इस्त्राईल मधील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीती व्हावा यासाठी इस्त्राईल मधील महत्वाच्या महामार्गाना छत्रपती शिवाजी महाराज मार्ग नाव देण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांचे प्रेरणादायी जीवन, रणणिती, लष्करी सामर्थ्य आणि व्यवस्थापन कौशल्य याची माहिती होते. भारत व इस्त्राईल दोन्ही देशातील प्राचीन संस्कृती समकालीन आहेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी शिवनेरी किल्ल्यावर लाईट साऊंड शो साठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचवणं ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे. स्त्री सन्मान आणि महीलांविषयी उदार भूमीका शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ विचाराचे बलस्थान असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पिंपळगावजोगा येथील अंगणवाडी सेविका वैशाली हांडे यांना यावर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. देहू संस्थान तसेच सज्जनगड संस्थानच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना मानाची वस्त्रे अर्पण करण्यात आली. शिवनेरी स्मारक समितीचे श्याम श्रोत्री,संजय खत्री, शुभम काजळे,सुजाता काजळे,गोविंद हिंगे,संजय मुथा आदींनी संयोजन केले.स्मारक समितीचे कार्यध्यक्ष मधुकर काजळे यांनी सूत्रसंचलन केले. रमेश कर्पे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT