NPT26B09498, NPT26B09499, NPT26B09500
नातेपुते (ता. माळशिरस) : येथे शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत साकारलेले किल्ले.
---
किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी नातेपुते झाले शिवमय!
शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचा उपक्रम; विविध किल्ल्यांचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. १२ : शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती साकारल्या. काही विद्यार्थ्यांनी किल्ल्यांवरील ऐतिहासिक घटनांचे नाट्यीकरण करून सादरीकरणही केले. अनेक इतिहासप्रेमींनी किल्ल्यांना भेट देऊन बालकलाकारांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, झोपड्यांसमोर किल्ले उभारणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसह नंदीवाले समाजातील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, प्रथम क्रमांक विभागून रोहन अडगळे व चैतन्य पिसे यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक समर्थ पागे, अधिराज देशमुख व श्रवण खंडागळे, तर तृतीय क्रमांक श्रावी उराडे, राजवर्धन चिंचकर व वीर जोरे यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ विनायक काळे, शिवांश कोरटकर, कैवल्य राऊत, रविराज कोळी, राम इंगोले व आयुष लाळगे यांची निवड झाली.
स्पर्धेचे परीक्षण इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर, मंगेश दीक्षित व संजय ढवळे यांनी केले. स्पर्धेचे प्रायोजकत्व मामासाहेब पांढरे मित्र मंडळाने स्वीकारले. यावेळी संस्थापक सुनील राऊत, किशोर पलंगे, श्रीगणेश पागे, शशी कल्याणी, विवेक राऊत, धनंजय पवार, मामासाहेब पांढरे, अतुल बावकर, मोहित जाधव आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभ लवकरच होणार असून, सर्व स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्याची सफर घडविण्यात येणार आहे.
---
किल्ल्यांच्या चर्चेने नातेपुते झाले शिवमय!
स्पर्धेमुळे संपूर्ण नातेपुते शहरात शिवरायांच्या गडकोटांची चर्चा रंगली होती. किल्ले उभारण्यासाठी स्पर्धकांना कुटुंबीय आणि मित्रमंडळींनीही मदत केली. रायगड, प्रतापगड, राजगड, सुवर्णदुर्ग आणि तोरणा या किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.