शिवज्योत घेऊन मेढ्यापर्यंत धावल्या महिला
जावळी पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनोखी शिवजयंती
कुडाळ, ता. २० : जावळी पंचायत समितीच्या महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांनी यावर्षी गटविकास अधिकारी नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने किल्ले अजिंक्यतारा ते जावळी (मेढा) पंचायत समिती अशी ‘शिवज्योत’ आणून एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व सहभागी महिलांनी सकाळी सहा वाजता किल्ले अजिंक्यतारा गडावर शिवगर्जना करत शिवज्योत प्रज्वलित करून मेढ्याकडे मार्गक्रमण करण्यात आले. जावळी तालुक्याच्या हद्दीमध्ये शिवज्योतीचे आगमन होताच मोरावळे ते मेढा या मार्गावर स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले. मेढा बाजारपेठेतून वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात स्वागत करण्यात आले.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व शिव ज्योतीचे पूजन गटविकास अधिकारी नीलेश पाटील यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प अधिकारी श्रीमती खामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पवार, सुरेश पार्टे, नारायण शिंगटे, प्रकाश कदम, वेण्णा विद्यालयाचे प्राचार्य पाटील व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. शिवज्योत आणण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या रणरागिनी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पलता गायकवाड, हेमलता येवले, विजया भिलारे, अपर्णा जाधव, सविता सांगडे, शुभांगी कांबळे, अर्चना गंगावणे प्रतिमा कांबळे, कस्तुरी सूर्यवंशी, उषा उंबरकर, निर्मला नावडकर, वैशाली बामणे, श्रीमती देशमाने यांच्यासह कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी शिवज्योतीचे उत्तम नियोजन केले होते. जिल्ह्यातील हा एकमेव आगळावेगळा उपक्रम ठरला. याप्रसंगी विशाल रेळेकर व अन्वी नावडकर यांनी शिवगीतांचे सादरीकरणही केले.
फोटो :.......... 00944
मेढा (ता. जावळी) : पंचायत समितीच्या आवारात शिवज्येतीच्या पूजनप्रसंगी महिला अधिकारी, कर्मचारी. (महेश बारटक्के : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.