पुणे

किल्ले शिवनेरीवर रांगड्या संस्कृतीचे दर्शन

CD

ओतूर, ता. २२ : किल्ले शिवनेरीवरील शासकीय शिवजयंती सोहळ्यात ओतूर जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम प्रात्यक्षिकाने महाराष्ट्राच्या रांगड्या संस्कृतीचे दर्शन घडवले.
शिवजयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात लेझीमचे विविध प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध सादरीकरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, केंद्रप्रमुख कमलाकांत मुंढे यांच्यासह उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. तर शिवभक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले, अशी माहिती मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी यांनी दिली. लेझीम संघाला मार्गदर्शन वनिता जाधव, सुदेष्णा गाढवे व उषा भवारी यांनी या संघाला तयार केले होते. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन डुंबरे, जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त अशी टाळ्यांची दाद मुलांना मिळाली, अशी माहिती मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी दिली. लेझीम संघाला मार्गदर्शन वनिता जाधव, सुदेष्णा गाढवे, उषा भवारी यांनी केले. तर माधुरी शेटे, सतीश नलावडे, ज्योती शिरसाट, रूपाली गायकर, योगिता बुट्टे,संगीता ढाकणे, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष नितीन डुंबरे, नितीन पानसरे,जितेंद्र घुले, तुषार डुंबरे, कविता डुंबरे, प्रतीक्षा ढोकळे, पूजा दिवेकर, जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, संतोष डुंबरे यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT