पुणे

लावणी महाराष्ट्राची शान तर पोवाडा प्राण आहे

CD

KRK26B03809
करकंब (ता. पंढरपूर) : येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पोवाडा सादर करताना शाहीर डॉ. देवानंद माळी व सहकारी.
---
लावणी महाराष्ट्राची शान तर पोवाडा प्राण आहे
करकंब येथे शाहीर देवानंद माळी यांच्या पोवाड्याने वातावरण शिवमय
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. २४ : लोककलांमध्ये लावणी ही महाराष्ट्राची शान असली तरी पोवाडा आणि शाहिरी हा प्राण आहे. त्यामुळे या दोन्ही कलांना लोकाश्रय मिळाला पाहिजे, असे मत शाहीर डॉ. देवानंद माळी यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करकंब येथील आमदार अभिजित पाटील मित्र परिवाराने शाहीर माळी यांच्या पोवाडा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
येथील बस स्थानकाच्या पटांगणात सोमवारी (ता. २३) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अमरजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, प्रा. प्रदीप पाटील, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी रघुनाथ जाधव, उद्योजक अमोल शेळके, नूतन पंचायत समिती सदस्य शहाजी मुळे, सुभाष गुळमे, विठ्ठल कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे, अर्जुन शेटे, पांडुरंग व्यवहारे, अशोक शिंगटे आदींसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन गुळमे, रमेश खारे, घनश्याम शिंगटे, अशोक शिंगटे, धनंजय गुळमे, अरुण बनकर, रामभाऊ सलगर आदींनी परिश्रम घेतले.
---
पारंपरिक वाद्यांनी आणली रंगत
शाहीर माळी आणि त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात डफ, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांनी रंगत आणली. पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्यातून शिवाजी महाराजांच्या कार्याची महती ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहारे येत होते. अडीच तासांहून अधिक वेळ चाललेल्या या कार्यक्रमाने अवघे वातावरण शिवमय झाले होते. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणांनी कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT