पुणे

पूरग्रस्त बिहारमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्याचा दौरा

CD

पाटणा, ता १६ (पीटीआय) ः केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी बिहारमधील पूरग्रस्त वैशाली जिल्ह्याला भेट दिली. राज्यातील पूरग्रस्त भागातील बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी ते दिवसभराच्या बिहार दौऱ्यावर आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासमवेत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी वैशाली जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या तेरासिया आणि सराईपूर गावांची बोटीतून तसेच ट्रॅक्टरमधून पाहणी केली. त्यांनी तेथील पूरग्रस्त नागरिकांशीही संवाद साधला. पिकांचे झालेले नुकसान किती आहे, याचा ते आढावा घेणार असून स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेरासिया आणि सराईपूर गावांची पाहणी केल्यानंतर चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘आतापर्यंतचा हा सर्वांत भीषण पूर आहे. यावेळी पाण्याची पातळी २०१६च्या पुराच्या तुलनेत जवळपास एक फूट अधिक असल्याचे मला सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानही मी पाहिले.पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जात आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीची व्याप्ती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मी येथे आलो आहे. पाहणीनंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहे.’’

विरोधकांची टीका
चौहान यांच्या बिहार दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार मनोज झा यांनी पुराच्या परिस्थितीबाबत केंद्र सरकारने उशिरा प्रतिसाद दिल्याचा आरोप करत टीका केली. ‘‘त्यांनी इथे यायला खूप उशीर केला ते चार्टर्ड विमानाने येत असल्याचे मी ऐकले आहे. त्याऐवजी हा पैसा पूरग्रस्तांसाठी खर्च केला असता तर अधिक चांगले झाले असते,’ असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT