पुणे

शिवराज तिकाटणे परिसर समस्‍यांच्‍या विळख्‍यात

CD

शिवराज तिकाटणे समस्‍यांच्‍या विळख्‍यात


वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांची सुरक्षितता धोक्यात

सातारा, ता. १९ : शहरात प्रवेश करण्‍यासाठी असणाऱ्या अनेक चौकांपैकी शिवराज तिकाटणे हा महत्त्‍वाचा चौक आहे. या चौकात शहरातून महामार्गावर जाणारी, तसेच महामार्गावरून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी सेवामार्ग तसेच अंडरपास तयार करण्‍यात आला आहे. वाहनांची वाढती वर्दळ आणि अंडरपासमध्‍ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे हा परिसर समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडला आहे. हा परिसर सुरक्षित व वाहतूकयोग्‍य करण्‍याची परिसरातील नागरिकांची मागणी आहे.


वाढेफाटा, बाँबे रेस्‍टॉरंट, अजंठा चौक आणि शिवराज तिकाटणे या भागातील सेवारस्‍त्‍याने सातारा शहराला महामार्गाशी जोडले आहे. या ठिकाणाहून दररोज हजारो वाहनांची ये- जा सुरू असते. त्यापैकी शिवराज तिकाटण्याला भौगोलिक महत्त्‍व आहे. शहरातून कऱ्हाडबाजूकडे, तसेच तिकडून दररोज मोठी वाहतूक या परिसरातून होत असते. महामार्गाच्‍या दुतर्फा दिवसेंदिवस विस्‍तारत असणाऱ्या वसाहतींमधील नागरिकांचाही राबता याठिकाणी असतो. कऱ्हाड बाजूकडे जाणाऱ्या सेवारस्‍त्‍यावर बसथांबा उभारला असला, तरी प्रवाशांची गर्दी रस्‍त्‍याकडेलाच होत असते. त्यामुळे प्रवासी घेण्‍यासाठी बस रस्‍त्‍यातच थांबते. यामुळे सेवा रस्‍ते अपुरे पडत असून, याठिकाणी रुंदीकरणाचीही आवश्‍यकता भासू लागली आहे.
........
चौकट
.....

येथील नागरिक वैतागले

संभाजीनगर, विलासपूर, खिंडवाडी, समर्थनगर, खिंडवाडी, सत्‍वशीलानगर, बारावकरनगर, सिव्‍हिल कॉलनी यासह इतर भागातील हजारो नागरिक या भागातून दररोज ये-जा करत असतात. त्‍यातच शिवराज तिकाटणे अंडरपासमधील जागेत गेल्‍या काही दिवसांपासून अनेकांनी हातगाडे व छोटे- मोठे स्‍टॉल्‍स लावले आहेत. यामुळे या पुलाखाली जास्‍तीचा धोका निर्माण होतो.
............

उदयनराजेंना निवेदन...

शिवराज तिकाटणे, संभाजीनगर, विलासपूरला जोडण्‍यासाठी मोठे अंडरपास तयार करण्‍याची मागणी करणारे निवेदन संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, संग्राम बर्गे, राजू पिसाळ, शंभू पवार, किरण नलवडे, गणेश नलवडे, कौस्‍तुभ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे. यात नागरी सुरक्षेसाठी मोठ्या अंडरपासची मागणी केली आहे. आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. त्यानुसार त्‍यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्‍याशी चर्चा करत प्रश्‍न मार्गी लावण्‍याची विनंती केली आहे.
..............


सातारा :

............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा,न्यायालयाचा निर्णय..

'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा महासंगम! जय, शर्वरी, ऋषी आणि कमळीचा निर्णय पडणार का त्यांच्यावरच भारी?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत इंधन दरवाढ आणि टंचाईविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन

Pune Petrol Diesel Rate Hike: वाहनधारकांची चिंता वाढली; चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका..

१० किंवा १२ नाही, दररोज 'इतके' तास शूटिंग करतात 'ठरलं तर मग' चे कलाकार; सुट्टी कधी असते? जुईने केला खुलासा

SCROLL FOR NEXT