Shivsainik of Thackeray party Ambegaon demand to file case against Amit Shah politics sakal
पुणे

Pune News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंबेगाव तालुक्यातील ठाकरे पक्षाचे शिवसैनिक रस्त्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात फिर्याद व गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी

डी.के. वळसे पाटील

मंचर : “केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबत दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक व अन्यायकारक आहे. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे.

संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढाई करतील.”असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला. पेठ ता.आंबेगाव येथे गुरुवारी (ता.२३) केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात भोर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक अँड.अविनाश रहाणे, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, युवती तालुका अधिकारी नीलम गावडे, महिला आघाडी तालुका संघटक सुरेखा निघोट, विभाग प्रमुख बबन तोत्रे, शहर प्रमुख नंदू बोऱ्हाडे व परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.

भोर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कामकाजावर टीका केली. ते म्हणाले “धनुष्यबाण चिन्ह गद्दारांना देण्याचे काम केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला आहे.

विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविले जाते किंवा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत छापे टाकले जातात.स्वातंत्र्यानंतर प्रथमच हे घडत आहे. वाढत्या महागाईबाबत भाजप नेते ब्र शब्द काढत नाहीत. या अन्यायाच्या विरोधात मराठी बांधवानी एकत्र यावे.” यावेळ अँड. रहाणे व पवळे यांची भाषणे झाली.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत हीन व खालच्या भाषेत टीका करणे थांबवावे. अन्यथा राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शहा यांची राहील.

त्यांच्या टीकेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शहा यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी फिर्याद घ्यावी व गुन्हा दाखल करावा.असे निवेदन अँड.अविनाश रहाणे व सुरेश भोर यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिले आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वसई किल्ल्यावर शिवरायांच्या पोषाखात फोटो काढताना अडवलं, हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाचा मराठीत बोलण्यास नकार; VIDEO VIRAL

AUS vs IND 2nd ODI: विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद, १७ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; शुभमन गिलही स्वस्तात आऊट

Govardhan Puja: गोवर्धन पूजनासाठी CM योगी गोरखनाथ मंदिरात; गायींना खाऊ घातले गूळ-रोटी, म्हणाले: 'गोवंश भारताच्या समृद्धीचा आधार!'

Ayodhya: थंडीमुळे रामललांच्या दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल; ट्रस्टने जाहीर केली नवी वेळ

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

SCROLL FOR NEXT