पुणे: पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन मॉलवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलीय, केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा हा मॉल आहे. 
पुणे

पुणे : आर डेक्कन मॉलवर दगडफेक

शरयू काकडे

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील आर. डेक्कन मॉलवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद पेटला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर आंदोलने केली जात आहेत.

दरम्यान, या घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले आहे. आर. डेक्कन मॉलवरही शिवसैनिकांनी दगडफेक केली असून मॉलचे बरेच नुकसान झालं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा हा मॉल आहे. काही वेळापूर्वीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुडलक चौकात आंदोलन केले. त्यानंतर मॉलवर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. ज्यात मॉलबाहेरील शोकेसची काच फुटली आहे. सध्या आर. डेक्कन मॉलचे शटर बंद करण्यात आले आहे.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. कुठे आंदोलनं सुरु आहेत तर कुठे दगडफेक. नाशिकमधल्या भाजपा कार्यालयावरही शिवसैनिकांनी दगडफेक करत तोडफोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT