cm eknath shinde 
पुणे

1995 मध्ये बाळासाहेब तसं करु शकले असते...पण उद्धव ठाकरेंनी उडी मारुन स्वत:च...; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

Shirur Shivsankalp Abhiyan: शिवसेनेची शिवसंकल्प अभियान यात्रा शिरुरमध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

कार्तिक पुजारी

पुणे- शिवसेनेची शिवसंकल्प अभियान यात्रा शिरुरमध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काहींनी खोटं बोलून शिवसेना-भाजप नैसर्गिक युती तोडली. त्यांनी हजारो शिवसैनिकांचा विश्वासघात केला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी घणाघात केला.

सगळ्यांच्या साथीने एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालो आहे. आज मोठ्या संख्येने लोक पक्षात येत आहेत. मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर असं झालं नसतं. विभागात शाखा सुरु झाली तेव्हा मला शाखाप्रमुख करण्याचं ठरलं होतं. पण, मी सांगितलं जे माझ्यापेक्षा वरिष्ठ नेते आहेत त्यांचा विचार केला तर बरं होईल, असं ते म्हणाले. (shivsena cm eknath shinde speech in shirur shivsankalp abhiyan criticize uddhv thackeray )

पदाचा लोभ मला कधीही नव्हता. मी नगरविकास मंत्री होतो. माझ्यासारखे अनेक मंत्री सत्ता सोडून आम्ही बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी, पक्ष टिकवण्यासाठी आम्ही वेगळा मार्ग धरला. बंड करायचा असता तर २०१९ मध्ये जे झालं तेव्हाच केलं असतं. पण, तेव्हाही आणि आताही माझ्या मनात सत्तेचा लोभ नव्हता. मी बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे, असं शिंदे म्हणाले.

बाळासाहेब देखील १९९५ साली मुख्यमंत्री झाले असते, पण ते त्यांनी केलं नाही. त्यांनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवलं. शिवसेना बाळासाहेबांना शब्द दिला की कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री बनवेल. पण, जेव्हा वेळ आली तेव्हा उडी मारुन स्वत: मुख्यमंत्री बनले. हा इतिहास. मी इतिहासात खोलात जाऊ इच्छित नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

दीड वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे. आज आणि उद्यापण मी कार्यकर्ता म्हणूनच काम करेन. दीड वर्षात राज्याच्या विकासासाठी आपण काम केलंय. संकल्प पूर्ण करायला मेहनत, निर्धार लागतो, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT