Shirur Loksabha Election news
Shirur Loksabha Election news  Esakal
पुणे

Shirur Loksabha Election news : शरद पवारांना शह देण्यासाठी महायुतीचा मोठी खेळी! शिंदेंचा शिलेदार आज अजित पवार गटात प्रवेश करणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

Shirur Loksabha Election news : शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. आज (२६ मार्च) आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळं आता शिरुरमध्ये पुन्हा एकदा यापूर्वीचे प्रतिस्पर्धी आढळराव आणि कोल्हे यांच्यातच थेट लढत होणार आहे.

आज शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. २६) दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हेच दोन नेते ऐकमेकांविरोधात उभे होते. यावर्षीही या दोन नेत्यांमध्ये ही अटीतटीची लढत होणार आहे. यावेळी एकाच पक्षात फुट पडलेले दोन गटाचे नेते एकमेकांविरोधात उभे असणार आहेत. यामुळे ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

गेल्या वेळी आढळराव पाटलांचा पराभव हा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा बनला होता. तर यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मात देण्यासाठी आढळराव पाटलांसोबत अजित पवारांनी आखाणी केली आहे. त्यामुळे आज आढळराव पाटीलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असला तरी आढळराव पाटलांना उमेदवारी मिळणार का हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: आज तुमच्या यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

Yoga Tips: महिलांच्या प्रत्येक समस्येवर रामबाण आहे बद्धकोणासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Brain Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला ५ वर्षीय मुलीचा जीव, जाणून घ्या Naegleria Fowleri बद्दल सविस्तर

SCROLL FOR NEXT