Shivsena rebel candidate oppose to bjp candidates in Pune 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यात शिवसेनेच्या वाघांचा बंडखोरीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : भाजप आणि शिवसेनेची युती होऊन एकही जागा पदरात पडत नाही. त्यामुळे शिवसेनेतील वाघांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत दोन माजी आमदारांसह जिल्ह्यातील एक नेता आणि नगरसेवक यांनी अन्य पक्षांचे झेंडे खांद्यावर घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 

निवडणुकीसाठी युती होणार की नाही, यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. युती झाली, तर पुण्यातील आठपैकी किमान दोन जागा मिळाव्यात, अशी शहर शिवसेनेची मागणी होती. 'मातोश्री'वरील बैठकीतही शहरातील पदाधिकारी, नेत्यांनी तशी मागणी केली. तेव्हा पक्षश्रेष्ठींनी तुम्ही एकत्र बसून एकमत करा आणि मतदारसंघाची नाव सुचवा, अशी सूचना केली. परंतु मतभेदामुळे एकमत झाले नाही. दरम्यान, युतीची सोमवारी घोषणा झाली. परंतु, आठपैकी एकही मतदारसंघ पक्षाच्या वाट्याला येणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेच्या वाघांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. 

नेत्यांनी अन्य पक्षांतून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा पक्षात होती. दरम्यान, 'मनसे'ही निवडणूक लढविणार असल्याने एक पर्याय खुला झाला आहे. यापूर्वी कोथरूडमधून विजयी झालेले शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पर्यायांवर विचार करून निवडणूकीत उतरण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांनी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा मिळतो का, याची चाचपणी सुरू आहे. मोकाटे म्हणाले, "मी कोणताही विचार केलेला नाही. माझ्या नावाची चर्चा असल्याचे कानावर आले. त्यामुळे चर्चेला काहीच अर्थ नाही.''

शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबरही 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते हडपसर येथून इच्छुक आहेत. याबाबत त्यांचा संपर्क झाला नाही. कसब्यातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी (ता. 3) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यातील पक्षाचे एक नेते खडकवासलातून इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करीत अन्य पक्षांतून उमेदवारीसाठी हलचाली सुरू केल्या आहेत. 

कोणीही पक्ष सोडून जाईल असे वाटत नाही
हे दोन्ही नेते पक्ष सोडणार, ही चर्चा आहे. युतीच्या निर्णयावेळी पुण्यात शिवसेनेला दोन जागा मिळतील, अशी आशा आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून जाईल असे वाटत नाही. ज्या नावांची चर्चा आहे त्यांनी उच्चपदावर काम केल्याने ते असा निर्णय घेतील, असे वाटत नाही. 
- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Hike India : सामान्यांना इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले

Panchang 19 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, तिथी-नक्षत्र आणि आजचे धार्मिक महत्त्व

वाहन नाही, तरी महिलांच्या नावे वाहनांची नोंद! जाब विचारायला २००० महिला सोलापूरच्या महिला व बालविकास कार्यालयात, ई-केवायसी केली, दुरुस्तीही केली, तरी लाभ बंद

आजचे राशिभविष्य - १९ मे २०२६

Healthy and Tasty Breakfast Smoothie: सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; फक्त 3 पदार्थांत तयार करा हेल्दी आणि टेस्टी स्मूदी

SCROLL FOR NEXT