पुणे

शिवसेनेने १९८५ मध्ये प्रथमच विधानसभा प्रचार सभेत मशाल केली प्रज्वलित

आंबेगाव विधानसभा मतदार संघात १९८५ मध्ये शिवसेनेचे उमेदवार मार्तंड राक्षे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचे चिन्ह मशाल होते.

डी .के. वळसे-पाटील

आंबेगाव विधानसभा मतदार संघात १९८५ मध्ये शिवसेनेचे उमेदवार मार्तंड राक्षे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचे चिन्ह मशाल होते.

मंचर - आंबेगाव विधानसभा मतदार संघात १९८५ मध्ये शिवसेनेचे उमेदवार मार्तंड राक्षे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याचे चिन्ह मशाल होते. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख (स्व) बाळासाहेब ठाकरे यांचे मंचरला प्रथमच आगमन झाले होते. त्यांनी जुन्या बसस्थानकावर (नगरपंचायतीच्या दक्षिण दिशेला) जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी मशाल प्रज्वलित करूनच सभा सुरु झाली होती. उमेदवार राक्षे व मशाल चिन्ह सध्या सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात होत आहे. नेटकर्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर आंबेगाव तालुक्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अरुण गिरे, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, देविदास दरेकर, अजित चव्हाण, सचिन बांगर, तुकाराम काळे, कल्पेश बाणखेले, सुरेश घुले, राम तोडकर, अशोक बाजारे आदी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणे पसंत केले. तर जिल्हा प्रमुख सुरेश भोर, अँड. अविनाश राहणे, राजाराम बाणखेले, दिलीप पवळे, दत्ता गांजाळे, बबनराव गव्हाणे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच थांबणे पसंत केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह व शिंदे यांच्या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी हि ३७ वर्षापूर्वी असलेले मशाल चिन्हच पुन्हा मिळाल्यामुळे ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी अनेक गावात जल्लोष साजरा केला.

फेसबुक, व्हाट्सएप, इन्सट्राग्रामच्या माध्यमातून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे.याबाबत सुरेश भोर म्हणाले “ता.२ मार्च 1985 रोजी मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ७४ नगरसेवक व एक आमदार निवडून आले होते. सध्या मोबाईलच्या स्टेटसवर अनेक युवक-युवती व जेष्ठ नागरिकांनी "उष:काल होता ,होता काळरात्र ही झाली. आता पेटवा पुन्हा आयुष्याच्या मशाली" या जुन्या गीतासह मशालचिन्ह व्हायरल केले जात आहे.जुन्या काळातील राक्षे यांचा फोटो व मशालचिन्ह पाहून जेष्ठ नागरिक जुन्या आठवणीना उजाळा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT