dekhava Sakal
पुणे

पुण्यात शिंदे-ठाकरे अन् सत्तासंघर्षाचा देखावा; पोलिसांनी परवानगी नाकारली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ता संघर्षाच्या देखाव्याला पोलिसांकडून विरोध करण्यात आला आहे. पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाकडून या देखाव्याची परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी नकार दिल्यामुळे मंडळाकडून नवीन देखावा तयार करण्यात येणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा आमचा हेतू नव्हता असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

दरम्यान, पुण्यातील बुधवार पेठ येथे असलेल्या नरेंद्र मित्र मंडळाने या देखाव्यासाठी पोलिसांना परवानगी मागितली होती. राज्यात चाललेला सत्तासंघर्षावर हा देखावा होता. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष आणि राज्यातील सत्तांतर अशी या देखाव्याची पार्श्वभूमी होती. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना पोलिसांकडून या देखाव्याची परवानगी नाकारली आहे.

त्यानंतर, कुठल्या ही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न हा देखव्यातून होणार नव्हता असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

चुकीचे काम करावे, नोकरी सोडावी म्हणून ‘फायनान्स’मधील तरुणीचा विनयभंग, छळ! ब्रॅंच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, एरिया क्रेडिट मॅनेजर, लिगल हेडसह १० जणांवर गुन्हा

Kannad News : कन्नड नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी ९ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर

Boisar Fire : बोईसरमधील कार्पेट कारखान्याला आग; चार कामगार गंभीर जखमी

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT