‘शिवशंकर’च्या ठेवी परताव्याचे निर्देश
‘सहकार’ला शासनाचे पत्र; आंदोलनाच्या निवेदनांची दखल
कऱ्हाड, ता. २३ : शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्यात, त्यातील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली आहे. त्या संदर्भातील निवेदनातील मुद्द्यांनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश सहकार विभागाच्या आयुक्त व निबंधकांनी दिले आहेत.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या मंत्रालयातील अवर सचिव मंजूषा साळवी यांनी पत्र दिले आहे. येथील उपनिबंधकांना ठेवीदारांनी आंदोलनाचे निवेदन दिले होते. त्याचा संदर्भ या पत्रात दिला आहे. निवेदनात नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार, संबंधित निवेदनातील मागण्यांचा विचार करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या स्तरावरून कार्यवाहीबाबत कळवावे, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असेही पत्रात नमूद आहे. त्या पत्राच्या प्रती तातडीच्या कार्यवाहीसाठी जिल्हा उपनिबंधक आणि कऱ्हाडच्या उपनिबंधकांनाही पाठविल्या आहेत. शासनाच्या निर्देशांमुळे ठेवीदारांच्या मागण्यांबाबत प्रशासकीय स्तरावर पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, ठेवी प्रत्यक्ष कधी परत मिळणार आणि संबंधित प्रकरणात कोणती कारवाई होणार? याबाबत पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.