babasaheb narendra modi 
पुणे

बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मदिवशी मोदींच्या मराठीतून शुभेच्छा

कार्तिक पुजारी

पुणे- बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी बोलताना गौरवोद्वार काढले. मोदींनी मराठीतून बोलत त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मी सुरुवातीलाच साष्टांग नमस्कार करतो. शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे. त्याचे आचरण करण्याची शक्ती मला मिळावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असं मोदी म्हणाले.

बाबासाहेबांना १०० व्या वर्षांत पदार्पणासाठी शुभेच्छा. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळाले आहे. पुढेही त्यांचे आशिर्वाद मिळत राहावे ही मंगलकामना. सुमित्रा महाजन यांचेही कार्याक्रमाचे आयोजन करण्यासाठी आभार. बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांसोबत येण्याची मला संधी मिळाली. आपल्या वैदात ऋषी मुनिंनी १०० वर्षांपेक्षा अधिक वय जगल्याचं सांगितलं आहे. ही योग साधना आहे, असंही मोदी म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या तपस्येने योग सिद्ध केला आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त अनेक संयोग जुळून आले आहेत. बाबासाहेब १०० व्या वर्षात पदार्पण करत असताना देशही ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. बाबासाहेब स्वत: अनुभव करत असतील की हा महाभारतीचा प्रत्यक्ष आशिर्वादच आहे. आणखी एक संयोग आहे. देश ७५ व्या स्वातंत्र्य वर्षात प्रवेश करत असताना स्वातंत्र्य सैनिकांचा, देशातील अमर आत्मांच्या इतिहास लिहिला जाणार आहे. हेच पुण्य काम बाबासाहेबांनी केलं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी या कामासाठी लावलं आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य जनमानसात पोहोचण्यासाठी जे काम केलंय त्यासाठी आपण ऋणी आहोत.

चार दशकांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंचे कार्यक्रम अहमदाबादमध्ये आयोजित केले जात होते. त्यावेळी मी तिथे उपस्थित राहायचो. जाणता राजाच्या प्रारंभिक काळात ते पाहण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. त्यांनी इतिहास प्रेरणेसोबत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. खरा इतिहास पोहोचवण्याची गरज आहे. ते काम बाबासाहेब पार पाडत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. त्यांचे प्रयत्न इतिहासापुरते मर्यादीत नाहीत, त्यांनी शिवाजी महाराजांना जगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा परिवारही सामाजिक कार्यात सक्रिय असतो. शिवसृष्टीच्या निर्मानाच्या अभूतपूर्व संकल्पनावर काम करत आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांचा जो आदर्श समोर ठेवला आहे., तो आम्हाला प्रेरणा देत राहील. मी बाबासाहेबांच्या उत्तम आरोग्याची शुभकामना करतो, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT