पुणे

उरुळी कांचनमध्ये क्रौर्याचा कळस

CD

उरुळी कांचन, ता. १७ : चारित्र्यावर संशय घेत ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून एका पतीने २४ वर्षीय पत्नीला अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उघडकीस आली. क्रौर्याचा कळस म्हणजे, या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला रुग्णालयात न नेता तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवले होते.

याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २० एप्रिलला सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पीडितेचा पती मद्य पिऊन घरी आला आणि ‘तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,’ असे म्हणत त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर ‘तुला फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही,’ अशी धमकी देत त्याने घरात शौचालयाच्या स्वच्छतेसाठी ठेवलेली ॲसिडची बाटली आणून त्यातील ॲसिड तिच्या गुप्तांगावर ओतले. असह्य वेदनेने महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमाने घराचा दरवाजा आतून बंद करून तिला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या तिच्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले. मात्र, तोपर्यंत आरोपीने याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत घरातून पळ काढला.
अखेर, शनिवारी (ता. ९) पती कामावर गेल्याची संधी साधून, पीडितेने आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि थेट माहेर गाठले. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. या घटनेने हादरलेल्या नातेवाईकांनी तिला तातडीने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार घेतल्यानंतर पीडितेने शुक्रवारी (ता. १५) तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करत आहेत.

‘माझ्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत’
पत्नी गंभीर जखमी अवस्थेत असतानाही, ‘माझ्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत,’ असे कारण देत आरोपी पतीने तिला रुग्णालयात नेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर तिला माहेरी किंवा इतर कोणाकडेही जाऊ न देता तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT