Murder sakal
पुणे

धक्कादायक! आर्थिक कारणातून पतीने केला पत्नीचा खून

घटस्फोटीत पत्नीस पैसे देण्याचा बहाणा करीत केला खूनाचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

पुणे : घटस्फोट घेतल्यानंतरही आर्थिक कारणावरून पत्नीसमवेत होणाऱ्या वादामुळे पतीने पत्नीवर (Wife) कोयत्याने वार करून तिचा खुन (Murder) करण्याचा प्रयत्न केला. हि घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता वडगाव शेरीतील गवळीवाडा येथे घडली.

सनी बाळु गायकवाड (वय 32, रा.झेड कार्नर, केशवनगर मुंढवा) असे अटक (arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा(FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी सनी गायकवाडचा 2011 धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता.

त्यानंतर 2017 मध्ये काही कारणास्तव ते विभक्त राहत होते, तर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु, एकत्र राहत असलेल्या कालावधीत फिर्यादीने गायकवाडला काही पैसे दिले होते. त्यामुळे त्या त्याच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करीत होत्या. गायकवाड याने शुक्रवारी दुपारी फिर्यादीस फोन केला. "मी तुझ्या घरी येतो व तुझे काय असतील ते पैसे देऊन टाकतो' असे सांगून त्याने फिर्यादीस तिच्या घराच्या खाली बोलावले.

त्यानंतर पैशाच्या कारणातून त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यानंतर गायकवाडे त्याच्याकडील चाकूने फिर्यादीवर वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विवेक सिसाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT