crime-pune
crime-pune 
पुणे

पुणे : धक्कादायक! शिक्षकाने केला दहा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासगी शिकवणुकीचा वर्ग सुटल्यानंतर एका शिक्षकाने दहा वर्षीय विद्यार्थिनीला गृहपाठाचे कारण सांगून थांबवत विनयभंग केल्याची घटना खडकीत घडली.

याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराविरुद्ध बालकांचे संरक्षण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. 19) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. आशिष युसूफ शेख (वय 48, रा. खडकी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी मुलीच्या आईने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत शेखचा खासगी शिकवणुकीचा वर्ग असून त्याठिकाणी तो विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करतो. काल क्‍लास सुटल्यानंतर त्याने एका 10 वर्षीय मुलीला गृहपाठाचे कारण देऊन थांबविले.

सर्व विद्यार्थी निघून गेल्यानंतर शेखने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे अधिक तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT