Video : ट्रॅफिक पोलिसचा मायकेल जॅक्‍सन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

इंदौरमधील वाहतुक पाेलिस कर्मचारीचे ज्येष्ठ क्रीडासमीक्षक सुनंदन लेले यांनी केले काैतुक.

इंदौर ः देशातील महानगरांमध्ये वाहतुकीची शिस्त लोक पाळत नसल्याची खंत नेहमीच व्यक्त केली जाते. परंतु इंदौरमधील न्यायालय चौक याला अपवाद ठरत आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात रहदारी असूनही तेथील वाहतुक सुरळीत सुरु असल्याचे चित्र तुम्हांला दिसेल. याचे सर्व श्रेय जाते रणजीत सिंग नामक वाहतुक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्य रहदारीच्या रस्त्यावर रणजीत सिंग हे अनोख्या पद्धतीने वाहतुकीचे नियमन करतात. त्यांची वाहतुक नियमनाची शक्कल अनेकांना थक्क करुन जाते. त्यामुळे ते केवळ इंदौरमध्येच नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी त्यांना ट्रॅफिक पोलिसचा मायकेल जॅक्‍सन असा नुकताच किताब दिला आहे.

इंदौरमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात क्रिकेटचा नुकताच कसोटी सामना झाला. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले हे इंदौरमध्ये असताना न्यायालय चौकात गेले होते. तेथे त्यांना रणजती सिंग वाहतुकीचे नियमन करताना आढळले. लेले यांना रणजीत सिंग यांचे वाहतुक नियमनाच्या कौशल्याचे कौतुक वाटले.

या शहरात जन्मणारी मूलगी ठरणार लखपती

त्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रण केले. झेब्रा क्रॉसिंगचा वापर पादचाऱ्यांना करता यावा यासाठी रणजीत सिंग कसे प्रयत्न करतात याचे लेलेंनी विवेचन केले आहे. इंदौरला लोक रणजीत सिंग यांना पाहण्यासाठी वाकडा रस्ता करुन या रस्त्यावरुन जातात. प्रत्येकाने आपले काम मनापासून आणि आनंदाने केले तर सगळीच कामे सुंदर असतात. सगळेजण त्याचे ऐकतात आणि शिस्त पाळतात असेही लेलेंनी रणजीत सिंग यांचे कौतुक केले आहे.

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Traffic Police Seems To Be Michael Jackson