Crime 
पुणे

खर्चासाठी पाचशे रुपये न दिल्याच्या रागातुन विश्रांतवाडीमध्ये दुकानदारावर कोयत्याने वार, एकास अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - खर्चासाठी पाचशे रूपये न दिल्याच्या रागातुन तरुणाने एका दुकानदारावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता विश्रांतवाडी येथे घडली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. 

विनोद उत्तम पवार (वय 35, रा.रामगड वस्ती, कळसगाव, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संजय लक्ष्मण गोयल (वय 28, महालक्ष्मी विहर सोसायटी विश्रांतवाडी ) असे गंभीर जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय गोयल यांचे विश्रांतवाडीतील कळसमध्ये शांती हार्डवेअर ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. तर आरोपी विनोद इमारतींना रंग देण्याचे कामे करतो. विनोद हा नेहमीप्रमाणे फिर्यादी संजय गोयल यांच्या दुकानात पेंटिंगचे साहित्य घेण्यासाठी जात होता. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, रविवारी दुपारी एक वाजता विनोद हा फिर्यादी संजय यांच्या दुकानात गेला. त्याने फिर्यादी संजय यांच्याकडे 500 रुपये मागितले. मात्र, धंदा न झाल्याने संजय यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने "थांब तुझा जीवच घेतो,' अशी धमकी देत विनोद तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळातच तो हातात कोयता घेऊन परत आला. पैसे न दिल्याच्या रागातून त्याने संजय यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. त्यानंतर तो तेथून पसार झाला. दरम्यान, या हल्ल्यात फिर्यादी संजय गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT