shops are still open dont stalk things says in Pune.jpg
shops are still open dont stalk things says in Pune.jpg 
पुणे

Coronavirus : दुकाने सुरू आहेत; साठा करू नका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरसचा मुकाबला पुणेकर करत आहेत. प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. अशा परिस्थितीत घाबरून जाऊन जीवनावश्‍यक वस्तू, धान्य, औषधांचा साठा करण्याचे प्रकारही नागरिकांकडून घडत आहेत. या प्रकारापासून सुजाण पुणेकरांनी दूर राहण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर, साठा करण्यापासून लोकांना परावृत्त करण्याचीही गरज आहे.

साठा करणाऱ्यांची संख्या वाढत राहिल्यास गरजूंना टंचाई भासू शकते. अनावश्‍यक कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. या संभाव्य धोक्‍यापासून पुणेकरांनी जागरूक राहिले पाहिजे.

शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला, दूध, फळे तसेच मॉलमधील धान्य व किराणा विभाग, अन्य जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. तरीही अनेक नागरिकांकडून गेले दोन ते तीन दिवस औषधे, धान्य, वस्तू व अन्य जीवनावश्‍यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा केला जात आहे. या प्रकारामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचीच टंचाई निर्माण होऊ शकते. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गरजू, कष्टकरी, गोरगरीब, मजूर, विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुजाण नागरिकांनी, सजग पुणेकरांनी आवश्‍यकतेप्रमाणेच जीवनावश्‍यक वस्तू खरेदी कराव्यात.

कोरोना विषाणूबाबतच्या शंका इथे विचारा (टोल फ्री क्रमांक) : 18002334120
जीवनावश्‍यक वस्तूंचा गैरप्रकार/काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार करा : 100 (पोलिस नियंत्रण कक्ष), व्हॉटस्‌ऍप करा : 8975283100
प्रतिक्रिया/सूचना कळवा : #WeCareForPune ट्‌विटर, इन्स्टाग्राम लोगो वापरावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT