bhor 
पुणे

भोरमधील दुकानांबाबत प्रशासनाने घेतलाय महत्त्वाचा निर्णय

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर शहरात १७ जूनला कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भोर शहर व तालुका कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे शनिवारपासून (ता. २७) भोर शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत अटी व शर्तींच्या आधारे उघडली जाणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. 

याबाबत शुक्रवारी (ता. २६) दुपारी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि नगरपालिका प्रशासनाने व्यापारी व इतर व्यावसायिकांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्याधिकाऱ्यांना माहिती दिली. 

शहरातील सर्व रस्ते व मुख्य बाजारपेठ मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यापासून बंद करण्यात आली होती. परंतु, आता शहर व तालुका कोरोनामुक्त झाल्याने शनिवारपासून शहरातील सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. सर्व दुकानदारांना व व्यावसायिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक असून, दुकानात येणा-या ग्राहकांसाठी सॅनिटायझरची आणि हात धुण्याची सोय करावी लागणार आहे. दुकानांमध्ये गर्दी झाल्यास नगरपालिका प्रशासनाकडून संबंधीत दुकान सील करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय मास्कशिवाय शहरात कोणालाही फिरता येणार नाही. मास्क न वापरणा-या व्यक्तींना आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाचे एक पथक कार्यरत राहणार आहे. शहरातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु होणार असले, तरीही नागरिकांनी व दुकानदारांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाचा प्रसार होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Devendra Fadnavis on Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार का?; दस्तुर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात केला खुलासा...

Pune Crime : पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाला गोळी झाडून संपवलं, कुटुंबाने अपघात असल्याचं भासवलं

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

आधी भुताची कथा मग २: ३० वाजता खिडकीबाहेर लावलं ते गाणं... कोकणात शर्वरीसोबत जयचा प्रॅन्क, ती इतकी घाबरली की...

SCROLL FOR NEXT