e-cigarettes sakal
पुणे

Pune Crime : इ-सिगारेट विक्री करणाऱ्या पुण्यातील दुकानांवर छापे

तंबाखूजन्य इ-सिगारेट विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपयांच्या इ-सिगारेट जप्त केल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कॅम्प परिसरात तंबाखूजन्य इ-सिगारेट विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपयांच्या इ-सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.

कॅम्प परिसरात एमजी रस्त्यावरील तीन दुकानांमध्ये तंबाखूजन्य इ-सिगारेटची विक्री सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने मंगळवारी (ता. २०) कॅम्प परिसरातील इ-सिगारेट विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकले.

त्यात दोन लाख ३२ हजार रुपयांच्या तंबाखूजन्य इ-सिगारेट जप्त केल्या आहेत. जप्त केलेला मुद्देमाल लष्कर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, रेश्मा कंक, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT