Shop-Close 
पुणे

Coronavirus : पुणे शहरातील दुकाने बंदच राहणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुढील आदेश येईपर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने गुरुवारी घेतला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला बंद आता अनिश्‍चित काळापर्यंत पुढे गेला आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पुणे व्यापारी संघाने स्वयंस्फूर्तीने १७, १८ व १९ मार्च रोजी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे ८२ संघटनांशी संबंधित शहरातील सुमारे ३५ ते ४० हजार दुकानदार, व्यावसायिक त्यात सहभागी झाले आहेत. 
कापड, इलेट्रॉनिक वस्तू, वह्या-पुस्तके, फर्निचर, हार्डवेअर, प्लॅस्टिक उत्पादने, रंग, सिमेंट, वाळू, स्टेशनरी-कटलरी, सराफ आदी विविध प्रकारच्या व्यावसायिकांचा त्यात समावेश आहे. बंदची मुदत गुरुवारी सायंकाळी संपत होती. 

या पार्श्‍वभूमीवर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे, यावर चर्चा झाली. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका बैठकीत पदाधिकाऱ्यांनी घेतली. औषधे, किराणा भुसारसारख्या अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय सुरू राहणार आहेत.  

सभेनंतर पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, रतन किराड, सुभाष संघवी, राजेश शहा, महेंद्र पितळीया, जयंत शेटे, हेमंत शहा, मनोज सारडा, अभय गाडगीळ यांनी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. 

शहरात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून दुकाने बंद ठेवण्याचे आश्‍वासन महासंघातर्फे त्यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT