Shops-Coronavirus 
पुणे

Lockdown : नागरिकांच्या 'या' चुकांमुळेच पुण्यातील दुकाने बंद होणार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजवंताला घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

या भागातील मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही निवंगुणे म्हणाले. नागरिक सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळत नसल्याने व्यापाऱ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. दुकाने बंद राहणार असली तरी ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी दिली जाणार आहे.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनाथ सोमसे, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, सुनिल गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT