Doctor 
पुणे

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्‍टरांची कमतरता संपणार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे कनिष्ठ डॉक्‍टरांच्या आवश्‍यक संख्येच्या पूर्ततेसाठी मदत होणार आहे. मात्र, रुग्णालयाला सध्या सुमारे दोनशे परिचारिकांची गरज भेडसावत आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव रुग्णालयाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविला आहे.

शहर परिसरातील गोरगरीब रुग्णांना परवडेल, अशा दरात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. मात्र, मागील काही वर्षांत पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर भागांमधूनही रुग्ण येथे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येत, असल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयात काही नवीन विभाग सुरू होणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाला जादा मनुष्यबळाची गरज भेडसावू लागली आहे. 

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ‘‘रुग्णालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, मे २०२० मध्ये आणखी ३६ विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल. 

कनिष्ठ डॉक्‍टरांच्या कमतरतेचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, काही परिचारिका काम अर्धवट सोडून जात असल्याने तसेच नवीन विभाग लवकरच कार्यरत होणार, असल्याने जादा परिचारिकांची गरज भासणार आहे. तीस खाटांच्या नवजात अर्भक विभागासाठी २५ ते ३० तर सध्याच्या दोन अतिदक्षता विभागांसाठी १८ ते २० परिचारिकांची आवश्‍यकता आहे. 

याशिवाय तिसऱ्या अतिदक्षता विभागासहित उरोरोग, नेत्ररोग, त्वचारोग हे नवीन विभाग सुरू होणार असून, न्युरोसर्जरी विभागाचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी देखील परिचारिकांच्या नेमणुका होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रुग्णालयाने महापालिका आयुक्तांकडे सुमारे जादा दोनशे परिचारिकांच्या नेमणुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. 

परिचारिकांच्या नेमणुका करताना त्यांच्या परीक्षा घ्याव्या लागतात. परंतु, त्यामध्ये वेळेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून परिचारिकांच्या नेमणुका केली जावी, अशी मागणीही आम्ही आयुक्तांकडे केली आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT