पुणे

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं : पंकजा मुंडे

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : दहशतवादाने सर्व जगाला पोखरले असून, त्याच्या झळा भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे सांगितले. 

लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ''पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट - 2019' चे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना मुंडे बोलत होत्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवसेंदिवस फोफावत चाललेला दहशतवाद ही केवळ भारतासमोरच नव्हे तर जगासमोरच मोठी समस्या बनत चालली आहे. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशवादी हल्ल्याने अत्यंत दु:ख झाले. याची मी निंदा करते. हुतात्मा जवानांच्या परिवाराच्या दु:खात सरकार सामील आहे. आपल्या मुलांना सैनेत पाठविण्यासाठी धैर्य लागते. ते हुतात्मा झालेल्या जवानांच्या आई आणि पत्नीने दाखविले. दहशतवाद हा कर्करोगासारखा आजार आहे. त्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्याबरोबरच आपणही सज्ज आहोत. 

यावेळी विद्यापीठाच्या वतीने बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनमंत गायकवाड यांना पाथ ब्रेकिंग व्यावसायिक ऑफ पर्सोना, मेलॉडिक पर्सोना ऑफ एमिन्स पुरस्काराने प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड यांना तर करिश्माई नेता पुरस्काराने पंकजा मुंडे यांना सन्मानित करण्यात आले. 

यावेळी प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड, प्रसिद्ध संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर, भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी ग्रुप) अध्यक्ष हनमंत गायकवाड, अभिनेत्री गुरूप्रित चड्डा, प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कविता पौडवाल, सर्जनशील कलाकार अनास्तासिया लिब्रा, एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष मंगेश कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती ढाकणे, कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळी, आदिनाथ मंगेशकर, डॉ. किशोर रवांदे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष मंगेश कराड यांनी उपस्थितांच्या वतीने पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला. तसेच या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT