SLC26B30555
फोटोओळ :
सोलापूर : शौर्य दिनानिमित्त आयोजित उपक्रमाबाबत पोलिस आयुक्तालयात निवेदन देताना दास शेळके, बाबा बाबरे, सतीश कुदळे, शेखर फंड, गणेश इंगळे आदी.
१० नोव्हेंबरला शौर्याचा दीपोत्सव
‘एक दिवा छत्रपतींसाठी’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
सोलापूर, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण जागविण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी ३६७ वा शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ‘एक दिवा छत्रपतींसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा सामना करून स्वराज्यावरील मोठे संकट परतवून लावले. या ऐतिहासिक पराक्रमाच्या स्मरणार्थ शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.
या उपक्रमांतर्गत शिवप्रेमी आणि नागरिकांनी घरासमोर, अंगणात अथवा देवघरात एक दिवा प्रज्वलित करून शिवरायांच्या शौर्याला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवरायांचे शौर्य, स्वाभिमान, स्त्रीसन्मान, सर्वधर्मसमभाव आणि लोककल्याणकारी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही महामंडळाने केले आहे. यावेळी दास शेळके, बाबा बाबरे, सतीश कुदळे, शेखर फंड, गणेश इंगळे, गणेश शिंदे, निरंजन नवगिरे, गणेश गवळी, निरंजन बोध्दूल आदी उपस्थित होते.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.