Pune PMC  sakal
पुणे

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

राष्ट्रवादी- काँग्रेसची भाजपवर टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्थायी समितीमध्ये राज्य सरकारविरोधात ठराव होत असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य गैरहजर राहिल्याचे आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची नामुष्की आली आहे. तर काँग्रेसने भाजपवर केवळ टीका केली आहे. मंगळवारी स्थायी समितीची बैठक सुरू होताच भाजपने आयत्यावेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या व होणाऱ्या याचिकांसाठी महापालिकेतर्फे खर्च केला जावा असा ठराव केला आहे. हा ठराव करताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी विरोध केला नाही. आम्ही उशिरा आलो, आम्हाला काही समजण्याच्या आतच भाजपने गडबडीत हा ठराव मंजूर केला केला असे प्रदीप गायकवाड, लता राजगुरू यांनी सांगितले. तर नंदा लोणकर यांनी प्रतिसाद दिला नाही.

हा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना या प्रस्तावास का विरोध केला नाही याचा खुलासा करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. त्याचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवला जाणार आहे असे सांगितले. आमच्या सदस्यांकडून चूक झाली, पण भाजपने स्वतःच्या याचिकेसाठी महापालिकेचा पैसा वापरणे योग्य नाही, ही भाजपची संस्कृती योग्य नाही. अशी टीका जगताप यांनी केली. विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काँग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले, ‘‘भाजपकडे पैसे नसतील तर काँग्रेस त्यांना न्यायालयात लढण्यासाठी पैसे देईल, पण अशा प्रकारे गडबडीत पुणेकरांच्या हिताचा नसणारा प्रस्ताव मान्य करणे योग्य नाही. दरम्यान, काँग्रेसच्या सदस्यांवर कारवाई करणार का? याबाबत त्यांनी उत्तर दिले नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT