lenyadri ganpati
lenyadri ganpati 
पुणे

श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविक भक्तांची गर्दी

दत्ता म्हसकर

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे आज (शुक्रवार) संकष्टी चतुर्थी निमित्त भाविक भक्तांनी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे १० ते १५ हजार भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.

आज पहाटे ४ वाजता देवस्थानचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे,जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.
संकष्टी चतुर्थी निमित्त श्री गिरिजात्मजकाच्या मूर्तीस व गाभाऱ्यास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ६:०० वाजता व दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान मार्फत भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. चंद्रोदयाच्या वेळी भाविकांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती करण्यात आली. नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दर्शनासठी भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती.

दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर, जुन्नर व परिसरातुन तसेच पुणे,नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते अशी माहिती अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी  शंकर ताम्हाणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT