पुणे

दहावीच्या निकालातील ''नो कॅंडिडेट'' गोंधळ मिटला

CD

वाल्हे, ता. ९ : दहावीच्या निकालात ''नो कॅंडिडेट'' असा उल्लेख झाल्याने चर्चेत आलेल्या जेजुरीतील श्रेया संतोष वाईकर या विद्यार्थिनीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. तिला ८७.८० टक्के गुण मिळाले असून, या निर्णयामुळे विद्यार्थिनीसह पालक आणि शाळा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूलमधील श्रेयाने दहावीची परीक्षा दिली होती. मात्र, शुक्रवारी ऑनलाइन निकालात तिचा निकाल दिसला नाही. पालकांनी पुणे बोर्डाकडे धाव घेतली असता, प्रणालीमध्ये ''नो कॅंडिडेट'' अशी नोंद असल्याचे समोर आले. विद्यार्थिनीकडे सर्व अधिकृत कागदपत्रे असतानाही असा निकाल आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला होता. बोर्डाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी की शाळा स्तरावरील चूक, याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली.
या प्रकरणाची दखल घेत बोर्डाच्या सहाय्यक सचिव वैशाली काळे यांनी तपास केला. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करत, शनिवारी सायंकाळी श्रेयाला तात्पुरत्या निकालाची प्रत देण्यात आली. ऑनलाइन निकाल अद्याप दिसत नसल्याने तांत्रिक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणातील दोषींची चौकशी करण्याची मागणी श्रेयाचे वडील संतोष वाईकर यांनी केली आहे.

संकेतस्थळावर गुणपत्रक उपलब्ध होण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्याने ही समस्या निर्माण झाली. तसेच संबंधित विद्यार्थिनीची निकालाची प्रत पालकांकडे देण्यात आली आहे.
- वैशाली काळे, सहाय्यक सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Baramati News : बारामतीच्या अथर्व पवार यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत उत्तुंग कामगिरी

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Pune Airport Security : वाढत्या बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचे आव्हान वाढले; ना-हरकत प्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT