पुणे

श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन सोहळा

CD

PNE26W51645
अहिल्यानगर ः श्रीचक्रधरस्वामी अवतार दिन महोत्सवाचे उदघाटन करताना वायंदेकर बाबा. समवेत मल्ले बाबा, निमगावकर बाबा, वाल्हेरज बाबा बीडकर, भगवान अनारसे, विजय साठे, ॲड. बाबासाहेब रणसिंग आदी.
----------------------
संप्रदायाचे विचार जपणे
काळाची गरज ः शास्त्री
अहिल्यानगर, ता. २० ः महाराष्ट्राला मोठी साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदाय अथवा महानुभाव संप्रदाय दोघांनीही आपल्या विचारांतून समाजाला एकत्र आणण्याचे आणि समतेचा संदेश देण्याचे कार्य केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान चक्रधर स्वामी यांच्या विचारांमध्ये मोठे साम्य आहे. संतांच्या शिकवणीचे सर्वांनी आचारण करावे, असे प्रतिपादन बाभूळगावकर शास्त्री यांनी केले.
अखिल भारतीय महानुभाव परिषद अंतर्गत जिल्हा महानुभाव परिषद व नगर तालुका महानुभाव समितीच्या वतीने श्री चक्रधरस्वामी यांचा ८०६ वा अवतार दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, कारंजेकर बाबा, कृष्णराज लाड, वाल्हेरज बीडकर, तालुका अध्यक्ष भगवान अनारसे, उपाध्यक्ष विजय साठे, सुरेखा ठोकळ, सुरंगा विधाते, भारती जाधव आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, की चक्रधर स्वामींनी दिलेला मानवता आणि शांततेचा विचार हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. संघटित होऊन समाजहित आणि मानवता धर्माचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी आपापल्या कुटुंबापासून कामाला सुरुवात करावी. चक्रधर स्वामींच्या विचारांशी सर्वांनी जोडले गेले पाहिजे. निमगावकर बाबा यांनी प्रास्ताविक केले. अविनाश धाराशिवकर व आशुतोष देसकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. बाबासाहेब रणसिंग यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

Marathi News Live Updates: मुलाखती पुढे ढकलणे पात्र उमेदवारांवर अन्याय, मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

SCROLL FOR NEXT