मायणीत चौंडेश्वरी देवी
मंदिराच्या बांधकामास प्रारंभ
कलेढोण, ता. १६ : मायणीत देवांग कोष्टी समाजाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिराच्या काँक्रिट कंपाऊंड बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी विजय वरुडे म्हणाले, ‘‘श्री चौंडेशरी देवीच्या मंदिराचा व जागेचा प्रश्न गेल्या २३ वर्षांपासून अनेक चर्चा, बैठका घेऊन देखील रेंगाळला होता. मात्र, आता सर्व समाजबांधवांनी मंदिर बांधण्याचा निश्चय केला असून, अल्पावधीतच येथे सुंदर अशा प्रकारचे मंदिर उभारण्यात येईल.
राहुल बाबर म्हणाले, ‘‘देवांग कोष्टी समाजाचे दैवत श्री चौंडेश्वरी देवीचे मंदिर बांधण्याचा संकल्प अनेक दिवसांपासून होत होता. मात्र, योग्य अशी जागा उपलब्ध होत नव्हती. या समाजाचे सचिव राजेंद्र बाबर व समाजबांधवांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्याकडे मंदिरासाठी योग्य जागा मिळावी, यासाठी सातत्याने आग्रही मागणी केली होती. त्या मागणीनुसार सुरेंद्र गुदगे यांनी जागा उपलब्ध करून दिली व मंडप देखील उभारून दिला.’’
खजिनदार नितीन वरुडे म्हणाले, ‘‘या जागेवर समाजाचे दैवत श्री चौंडेश्वरी देवीचे भव्य असे मंदिर उभारण्यात येणार आहे.’’
यावेळी जयश्री व तुकाराम दिवटे, कोमल व अजित तारळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन केले. यावेळ रवींद्र बाबर, किशोर बाबर, अरुण चोथे, किशोर चोथे, श्रीनिवास लिपारे, राहुल बाबर, चंदन वरुडे, अमर आवळकर, प्रकाश चोथे आदी उपस्थित होते. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.
फोटो
00539
मायणी : श्री चौंडेश्वरी देवी मंदिराच्या बांधकामाचा प्रारंभ करताना देवांग कोष्टी समाजबांधव.
(अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)