पुणे

चासमध्ये विश्‍वकर्मा मंदिराचा वर्धापनदिन

CD

चास, ता. २५ : चास (ता. खेड) येथील लिंबपेठ सुतार आळी येथे बांधण्यात आलेल्या श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई व श्री विश्‍वकर्मा मंदिराचा दहावा वर्धापन दिन आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय युवा कीर्तनकार ऋतिका कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रंमुग्ध झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चास येथील लिंबपेठ, सुतार आळी येथील तरूणांनी एकत्र येत दहा वर्षांपूर्वी गणपती, विठ्ठल रखुमाई, विश्‍वकर्मा यांचे मंदिर उभारलेले असून या मंदिराचा दहावा वर्धापन दिन मंगळवारी (ता. २४) साजरा करण्यात आला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, पूजा पार पडल्यावर नेमाचे भजन करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ पार पडल्यावर सुरेश गंजाळ यांच्या स्मरणार्थ प्रकाश गंजाळ, दीपक गुंजाळ यांच्या सौजन्यातून ऋतिका कदम यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री संजयभाऊ घनवट युवा मंच, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल टोके, सरपंच विनायक मुळूक, पोलिस हवालदार सुनील बोकड यांच्या वतीने भाविकांना देण्यात आलेल्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी उद्योजक संदीप घनवट, उपसरपंच सुनील वाळुंज, नवनाथ वाळुंज, अजित घनवट, समाधान राक्षे, संदीप ढमढेरे, प्रतीक बोऱ्हाडे उपस्थित होते. भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ गुंजवठा यांच्या वतीने रात्री जागर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT