The Shri Girijatmaj Temple at Shri Kshetra Lenyadri is being opened for Darshan from Monday 2.jpg
The Shri Girijatmaj Temple at Shri Kshetra Lenyadri is being opened for Darshan from Monday 2.jpg 
पुणे

लेण्याद्री दर्शनाचा मार्ग सोमवारपासून खुला; भाविकांना नियम बंधनकारक

दत्ता म्हसकर

जुन्नर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज मंदिर दर्शनासाठी सोमवार (ता.१६) पासून खुले करण्यात येत असल्याची माहिती श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार मंदिर खुले होत असून भाविकांनी स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक असून सामाजिक अंतर, मास्कचा वापर हा बंधनकारक राहणार आहे. गरोदर माता व लहान बालकांना प्रवेश मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे सहा महिन्यानंतर मंदिर खुले होत आहे. यामुळे भाविक तसेच परिसरातील विक्रेते, व्यावसायिक यांनी आनंद व्यक्त केला आहे.

देवस्थानच्या वतीने आज परिसरात स्वच्छता करून घेण्यात आली. पायऱ्यांच्या दर्शन मार्गाच्या सुरवातीला हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. भाविकांसाठी सूचना देणारे फलक लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

SCROLL FOR NEXT