bhimashankar 
पुणे

भीमाशंकरला येणाऱ्यांची गाडीच करणार जप्त

अरुण सरोदे

शिनोली (पुणे) : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये श्रावण महिन्यातही बंद राहणार आहे. त्यामुळे देशातील भाविकांनी व विषेशतः पुणे जिल्ह्यातील नागरिकांनीही भीमाशंकराचे दर्शन घेण्यासाठी येऊ नये, असे आवाहन भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त मधुकर  गवांदे यांनी केले आहे.  

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार, देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्ता कौदरे, गोरक्षनाथ कौदरे आदी उपस्थित होते. आजपासून श्रावणमास सुरू झाला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी भरणारी श्रावण महिन्यातील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द झाली आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. तसेच, खेड, आंबेगाव व इतर जवळील तालुक्यातील नागरिकांनीही दर्शन व्हावे, यासाठी आग्रह करू नये. तसेच, पोलिस प्रशासनाने ब्लू मॉरमॉन हॉटेलकडून व पोखरी घाटातून येणारे रस्ते ज्या ठिकाणी एकत्र होतात, तेथील पालखेवाडी येथे बंदोबस्त नेमावा, अशी सूचना या वेळी मधुकर गवांदे यांनी केली.

डिंभे, पालखेवाडी व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. त्यामुळे या भागात श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन व पर्यटनासाठी आढळून आल्यास संबंधिताची गाडी जप्त करून कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा, येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

मोठी बातमी! बसचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परतताना ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

IND vs AUS: कुलदीप यादवला भारताच्या T20 संघातून अचानक केलं बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्याकडे टिकल्या उडवायची बंदुक! बंदुक, कोयता घेऊन दोघे शिरले ज्वेलर्स दुकानात, पण एक दागिनाही न घेता ३० सेकंदात झाले पसार, वाचा...

SCROLL FOR NEXT