पुणे

श्री क्षेत्र वीर येथे भाविकांची गर्दी

CD

परिंचे, ता. १८ : पौष अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना समस्त पान व्यापारी, विजयकुमार धुमाळ व वाल्हेकर बंधू यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रेची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून मंदिर परिसरातील सर्व डागडुजी, पार्किंगची व्यवस्था, यात्रा काळातील नियोजन, मंदिराची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता या गोष्टी प्राधान्याने चालू असल्याचे मुख्य विश्वस्त मोहन धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
अमावस्येनिमित्त पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. साडेअकरा वाजता धुपारती करून बारा वाजता मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी एक वाजता गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
देऊळ वाड्यातील दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाइट व जनरेटर, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस आदी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. या वर्षीची यात्रा स्वच्छ, सुंदर व व्यसनमुक्त करण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना आव्हान करण्यात असून देवाचा लग्नसोहळा नियोजित वेळेत व्हावा तसेच सर्व विधी परंपरे नुसार वेळेत होण्यासाठी प्रशासनासोबत पत्र व्यवहार पूर्ण झाले असून लवकरच यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. यात्रा काळात फ्लेक्स बोर्ड लावण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT