आठ दिवस विचार अन् संस्कृती महोत्सवाने श्री कुमारस्वामींना अभिवादन
११७ व्या जयंती; व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर अन् ‘जीवन व कार्य’ ग्रंथाची पाचवी आवृत्ती प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : योगमहर्षी परमपूज्य महातपस्वी श्री कुमारस्वामी यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात ८ ते १५ ऑगस्टदरम्यान विचार, अध्यात्म व संस्कृतीचा आठ दिवसांचा महोत्सव रंगणार आहे. व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर आणि ‘महातपस्वी श्री कुमारस्वामी यांचे जीवन व कार्य’ या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रकाशनातून त्यांच्या विचारांचा जागर होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी दिली.
महोत्सवानिमित्त ८ ते १३ ऑगस्टदरम्यान सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रक्तदान शिबिराचाही समावेश करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होईल. यावेळी राजेंद्र मोयनाळ लिखित ‘महातपस्वी श्री कुमारस्वामी यांचे जीवन व कार्य’ या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. शशिकांत हलकुडे असतील, तर डॉ. सुहास पुजारी आणि ॲड. मिलिंद थोबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
--------------------
महोत्सवाची वैशिष्ट्ये
८ ते १५ ऑगस्ट : ११७ वा जयंती महोत्सव - व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर
१५ ऑगस्ट : ‘महातपस्वी श्री कुमारस्वामी यांचे जीवन व कार्य’ ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.