पुणे

चास येथे पालखी, कलशाची मिरवणूक

CD

चास, ता. २३ ः श्री क्षेत्र चास (ता. खेड) येथील श्री म्हातोबा मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सोमवारी (ता. २२) फुलांनी सजविलेल्या पालखीतून देवांच्या मूर्ती तसेच कलशाची सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चास येथील श्री म्हातोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराला चार वर्ष पूर्ण झाल्याने मंदिराचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मंदिरात पहाटे धार्मिक विधी पार पडल्यावर धार्मिक विधी, होमहवन व मूर्तीस्नानानंतर पूजा पार पडली. हिंजवडी, वाकड ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडहून आणलेल्या श्री म्हातोबा देवाची पालखी आखरवाडी येथे आल्यावर स्वागत करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीत भजनी मंडळे, फुलांनी सजविलेली पालखी व त्यामध्ये मुर्ती व कलश या ताफ्यासह मिरवणुकीच्या अग्रभागी नागरिक उपस्थित होते. पालखी मंदिरात गेल्यावर मंदिरात कमानकर भजनी मंडळ, भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ, गुंजवठा-सोमेश्र्वर भजनी मंडळ, म्हातोबा प्रा. भजनी मंडळ या संगीत भजनाच्या कार्यक्रमाने उत्सवात रंगत आणली. रात्री निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे नियोजन म्हातोबा देवस्थान कमिटी, समस्त ग्रामस्थ चास, आखरवाडी, गुंजवठा व पंचक्रोशी, सर्व बचत गट, महिला बचत गट, तरूण मंडळे तसेच गणपत मुळूक, समीर मुळूक, विठ्ठल मुळूक, दत्तात्रय मुळूक, बबन मुळूक, नथुराम मुळूक, भानुदास मुळूक, बाळकृष्ण मुळूक आदींच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! सायन सबवेमध्ये गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प; वाहनधारकांची तारांबळ

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

SCROLL FOR NEXT