श्रीरामपूरमध्ये पिकांचे पंचनामे सुरू
५६ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती; आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
श्रीरामपूर, ता. ३ ः खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने श्रीरामपूर तालुक्यात शेती पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी तालुक्यात ५६ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी स्मिता वाघ आणि तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी दिले आहेत.
नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करताना जिओ टॅगिंगसह छायाचित्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या समन्वयातून हे पंचनामे करण्यात येणार आहेत. संबंधित गावांतील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या संयुक्त स्वाक्षरीनंतरच पंचनामा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे नुकसानीची प्रत्यक्ष नोंद, क्षेत्राची खात्री आणि पंचनाम्याची पारदर्शकता राखण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
तालुक्यातील गावांची विभागणी करून गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, तसेच मूल्यमापन तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक असलेली सविस्तर यादीही जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळण्याच्या प्रक्रियेत पंचनाम्यांची नोंद महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची स्थिती, नुकसानीची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबत पंचनामा करणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार वाघ, गटविकास अधिकारी वाघ आणि तालुका कृषी अधिकारी राक्षे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.