Pune News sakal
पुणे

Pune News : स्वामी समर्थांची पालखी पुण्यात दाखल

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून श्री स्वामी समर्थ पालखी पुण्यात दाखल झाली असून बुधवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून श्री स्वामी समर्थ पालखी पुण्यात दाखल झाली असून बुधवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त तीन मार्चपर्यंत महापालिकेजवळील काँग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती करून मिरवणुकीला प्रारंभ होईल. २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करतील.

शुक्रवार एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांचे सादरीकरण होईल, तर दोन मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम होईल.

तसेच यंदाचा ‘श्री स्वामी समर्थ पुरस्कार बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे’ यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे वितरण येत्या तीन मार्च रोजी होणार आहे. उत्सवात सर्व दिवस रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT