श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना sakal
पुणे

'विघ्नहर' ची शेतकर्‍यांसाठी स्मार्ट शेतकरी कार्ड योजना

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार ता.२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजुर करण्यात आले. चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,मागील हंगामात १० लाख २१ हजार ३५० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ११ लाख ४२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा ११.१७ % इतका मिळाला.सहवीजनिर्मीती प्रकल्पातून ३ कोटी ८३ लाख ६१ हजार ८३६.२४ युनिट वीज निर्यात केली. डिस्टीलरी प्रकल्पातून ५२ लाख ५३ हजार लिटर रेक्टीफाईड स्पिरीटची निर्मीती केली.१४ लाख ५० हजार ७ लिटर ईथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना केला.

मागील वार्षिक सभेत डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पांची क्षमता वाढविण्यास संमत्ती दिली होती त्यानुसार सर्व परवाने प्राप्त झाले असुन सदर कामाची टेंडर प्रक्रिया सुरु आहे.पुढील हंगामात विस्तारीत प्रकल्प कार्यान्वित होईल.

शेरकर म्हणाले, सर्व सभासद व ऊस उत्पादक यांना त्यांचे ऊस बील,ऊस वजन,साखर कार्ड, मिळणारी साखर या माहितीसाठी स्मार्ट शेतकरी कार्ड योजना कार्यन्वित करत आहोत. यामुळे या सेवा घरबसल्या मिळणार आहेत. येत्या एक ऑक्टोबर पासुन स्मार्ट शेतकरी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच ई-ऊस नोंदणी अ‍ॅप तयार केले असुन यामुळे ऊसाची जलद व बिनचुक नोंद केली जाते. त्यानोंदीनुसार ऊस तोडणी प्रोग्राम संगणकाद्वारे निश्चित केल्याने ऊस तोडणी क्रमवारीत केली जाईल. कोणताही ऊस तोडताना मागे पुढे होणार नाही.

ऊस वाहतुकदारांना स्मार्ट ट्रान्सपोर्टर कार्ड देण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने घेतली जाणार आहे. कारखान्याचे सर्व कामकाज संगणकाद्वारे होणार असल्याने कामात सुसुत्रता येऊन कारखान्याच्या पगार व मजुरीवरील खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

या ऑनलाईन सभेत सभासद धोंडीभाऊ घंगाळे,गुलाब नेहरकर,अशोक घोडके,भालचंद्र नलावडे,जयवंत घोडके, संजय भुजबळ, शैलेंद्र नलावडे, जयवंत भोर, सुरेश वाणी, विजय भोर, सुधाकर डुंबरे, ऋषिकेश तांबे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी दुःखवट्याचा ठराव मांडला. आभार उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT